शुक्रवार, १२ ऑक्टोबर, २०१२

ओलावा ...


डोळ्यांतूनी टिपूसही मी ढाळत नाही,
आतल्या आत अश्रू कधी का वाळत नाही?

ओलावा हा सतत वाहतो काळजात ह्या,
फिरणाऱ्या ऋतुचक्रां का तो पाळत नाही?

दूर पांगल्या आपुल्यांची घुमते आठवण,
वेदनेस ह्या स्नेह कधी का टाळत नाही?

भलत्यांपाठी फिरते झुरते वेडे मन हे,
रीत जगाची हसत हसत का माळत नाही?

फरफट होता दु:ख जाहले गझलेत गोळा,
सौख्य आजचे गझलेस ह्या का जाळत नाही?

- अनुबंध

८ टिप्पण्या:

 1. very nice..very touching....!! you have nicely captured one persistent sentiment in all of us here (if i have understood correctly) :) all the best and keep writing :)

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. ब्लॉगवर खूप कमी वेळा अशी चांगली कविता वाचायला मिळते. कविता आवडली अभिनंदन.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. शिरीष, मेघना, सुबोध, मन:पूर्वक दाद दिल्याबद्दल धन्यवाद

  @Manali,
  Thanks for acknowledging the post.
  The sentiment persists within, irrespective of location.
  It dwells in everybody's heart to certain extent.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. Dear Abhishek,
  Your attempt is praiseworthy,however you have to master gazal vrittas especially the rhythm part of it.I am sure you will succeed,
  I am doing fine here.Eager for 2nd Dec.
  Shantanu

  प्रत्युत्तर द्याहटवा